एकाच कुटुंबातील चौघा महिलांवर बलात्कार !
नवी दिल्ली : एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर त्याने महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच संपूर्ण धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. आरोपीविरोधात 23 आणि 24 जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.