यावलला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेशाचे वाटप


यावल- तालुक्यातील सात लाभार्थी महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत एक लाख चाळीस हजार रुपयांचे व आत्महत्या केलेल्या दोन शेतकर्‍यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपयांचे धनादेश नामदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते बुधवारी यावल तहसीलदारांच्या दालनात देण्यात आला. यावल तालुक्यातील चोपडा मतदारसंघातील पथराळे येथील लताबाई मुरलीधर धिवर, साकळी येथील मुमताज कलींदर तडवी, मनवेल येथील सुनीता विकास अडकमोल, रावेर मतदारसंघातील फैजपूर येथील निर्मला श्रावण कापले, अद्रावल येथील नंदा बंडु चौधरी, पाडळसे येथील मनीषा आंनदा कचरे या दारीद्य्र रेषेखालील कुटुंबाचा कमवता कुटुंब प्रमुखाच्या निधनानंतर शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थीच्या वारसाला प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश असे एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.

शेतकरी आत्महत्या करणार्‍या कुटुंबासही मदत
तालुक्यातील टाकरखेडा येथील राजेंद्र शामराव सोनवणे व मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबास प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल गोविंदा पाटील, भाजपाचे सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


कॉपी करू नका.