इनोव्हा-स्वीप्ट अपघात चौघे जागीच ठार
कराड : इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीत झालेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ हा अपघात झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड येथील पाचवड फाट्याजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीची धडक झाली. या भीषण अपघात चार जण ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. ठार झालेल्यांमध्ये तीन पैलवान असल्याचे समजते. तसेच, ते पुण्यातील कात्रज येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.