पोलिओऐवजी पाजले सॅनिटायझर : आरोग्य अधिकार्‍यांसह तिघांची बडतर्फी


यवतमाळ : पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवेततून बडतर्फ केले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, सॅनिटायझर दिलेल्या 12 मुलांना सुरक्षितता म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.

वरीष्ठ डॉक्टरांचेही होणार निलंबन
संबंधित प्रकरणात तेथील वैद्यकीय अधिकारी (सीएचओ), आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका या तीन जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरी पवार यांनी सांगितले. याशिवाय वरिष्ठ डॉक्टरांवरही निलंबनासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाण्याचे संकेत त्यांनी दिले. भंडारा येथील दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !