अल्पवयीन बालिकेवर सामूहिक अत्याचार : आरोपी चुलतभावांना 20 वर्ष शिक्षा
नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना 20 वर्ष सश्रम कारावासासह प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील कोर्टाने सुनावली. पोक्सो कोर्टाचे विशेष सरकारी वकील (एडीजीसी) रामसुपाल सिंग यांनी बुधवारी सांगितले की, अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे (पीपो) विशेष न्यायाधीश पवन कुमार शर्मा यांच्या न्यायालयाने मंगळवारी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या लवलेश आणि सुरेश या दोन चुलत भावांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाच्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2017 मध्ये झाला होता अत्याचार
13 जानेवारी, 2017 रोजी बिसांडा पोलिस स्टेशन परीसरात सायंकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि त्यावेळी ती 17 वर्षांची होती. पोलिसांनी 22 जानेवारीला या दोघांना पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली.

