क्रुरतेचा कळस : 80 वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : मानवतेला काळीमा फासणारी घटना – उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली. नराधमांनी चक्क 80 वर्षीय सामूहिक अत्याचार केला असून या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 80 वर्षीय महिला घरामध्ये एकटीच होती. एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य घराला बाहेरून टाळ लावून गेले होते. त्याचवेळी आरोपी जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.