सुखद बातमी ! : मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी


नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात 8 ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. यामध्ये 8, 9 आणि 10 मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. याचबरोबर, जर 8 मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीचे वेळापत्रक जाहीर
याशिवाय, 12, 15. 16 आणि 17 तारखेला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलेला असून त्यांची बाजू ऐकली जाईल. 18 मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाईल. म्हणजेच 8 मार्चला अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि 18 तारखेपर्यंत असेल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, व्हर्च्युअल सुनावणीत अडचण येत असून प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीचे वेळापत्रक आखून दिले आहे. यामध्ये पहिली वेळ मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !