भुसावळात हवेत गोळीबार करणार्या दोघांना जामीन मंजूर
भुसावळ : लोणारी मंगल कार्यालयाजवळ 17 जानेवारी रोजी मध्यरात्री पाच संशयितांनी गस्तीवरील पोलिसांना पाहून पळ काढला होता. पळून जाताना त्यांनी हवेत गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत विल्सन जोसेफ आणि ऑस्टीन रामटेके यांना अटक केली होती. त्यांनी न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी 30 हजार रुपयांच्या जात मुचल्यावर तसेच दर सोमवारी शहर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालत त्यांना नुकताच जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे अॅड सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.

