यावलमध्ये प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर : लग्न मंडपात कारवाईच्या अक्षदा
यावल : जिल्ह्यात कोरोनाचा होत असलेल्या उद्रेकानंतर जिल्हाधिकार्यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर यावलमध्ये प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर आले आहे. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा महाराज देवस्थानवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रोत्सव रद्द असतांनाही सोमवारी भाविकांची गर्दी उसळल्याने तहसीलदार महेश पवार यांनी विश्वस्त समितीकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. तसेच गंगानगरात एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जाऊळाच्या समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याने नगरपालिका प्रशासनाकडू दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
दुकानदारांवरही धडक कारवाई
शहरात 13 दुकानदारांकडून प्रत्येकी 00 प्रमाणे एकूण साडे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस प्रशासनानेदेखील कारवाई करत 31 जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसुल केला आहे तर गेल्या दोन दिवसात 30 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 15 हजाराचा दंड वसुुल करण्यात आला.

