यावलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योंजनेंतर्गत नवीन पाणीपुरवठा लाईनीचे काम पूर्ण
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच होणार पाणीपुरवठा
यावल : नगरपरीषदेच्या विस्तारीत कार्यक्षेत्रातील प्रभागामध्ये सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या वैशिष्टपुर्ण योजनेंतर्गत पुर्ण झालेल्या जलकुंभ व पाईप लाईनीतुन अखेर पाणीपुरवठा करणार्या पाईप लाईनची योजनाही आता पूर्णत्वास आली आहे. नागरीकांकडून आता नव्या योजनेवरून पाईप लाईनीसाठी अर्ज गोळा केले जात असून जुन्या 659 कनेक्शन धारकांना जि.प.योजनेतून हे कनेक्शन दिले जाणार असून लवकरच पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.
योजना पूर्णत्वास आल्याचे समाधान : अतुल पाटील
यावल नगर परीषदेच्या माध्यमातून मागील या वर्षी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील यांच्या कारकिर्दीत अथक प्रयत्नातून शहरातील विस्तारीत क्षेत्रातील भविष्यात भेडसावणार्या प्रश्नाचे गांभीर्याने विचार करून सातत्याने पाठपुरावा करून या योजनेतून नवीन 10 लक्ष लीटर जल क्षमतेचे जलकुंभ सुमारे 75 लक्ष रुपयांचा निधी उभारणीसाठी सुमारे तीन कोटींच्यावर निधी पाईपलाईन व इतरत्र कामांसाठी उपलब्ध करून घेत अखेर आज या जलकुंभातुन पाणीपुरवठा वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली पाईप लाईनचे काम हे वेगाने पूर्णत्वास पोहोचले. या पाईपलाईन वरून या परीसरातील सुमारे 27 वसाहतींना यावरून पुर्ण दाबाचा स्वच्छ असा पाणीपुरवठा नळाव्दारे नागरीकांना मिळणार आहे. याकरीता विस्तारीत क्षेत्रातील राहणार्या नागरीकांना 1 एप्रिलपासुन या पाईपलाईनीवरून नवीन जोडणीच्या कामास सुरुवात होत आहे . दरम्यान या जलकुंभाव्दारे होणार्या पाणीपुरवठयाचा जुन्या सुमारे 659 धारकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक झड बसणार नाही. त्यांना या नवीन पाईप लाईनीतुन नळजोडणी करीता कोणताही खर्च लागणार नाही शिवाय त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. येत्या महिन्याभराच्या आत संपुर्ण परीसराला या नवीन जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान जवळपास तिन वर्षाच्या कार्यकाळातील परीरश्रमातून आपणास या पाणीपुरवठा योजनेस पुर्णत्वास नेल्याचा आत्मीक समाधान व आंनद असल्याचे सांगुन आपण नागरीकांना दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




