भुसावळात वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा
के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : शहरातील के. नारखेडे विद्यालयातील हरितसेनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधण्यात आली. सातवीच्या विद्यार्थिनींनी वृक्षांसाठी राख्या बनवून आणल्या. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने विविध झाडांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘झाडे आहेत म्हणून जीवन आहे’ आणि ‘झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी..जोगी तसेच हरितसेनेचे सदस्य डी.एम.हेलोडे, सी.डी.खडसे व विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम व वृक्षसंवर्धनाची भावना अधिक दृढ झाली.



