गौरखेडा सब स्टेशन परीसरात शॉर्टसर्किटने आग : मोठा अनर्थ टळला


गौरखेडा (महेंद्र पाटील) : येथून जवळच असलेल्या गौरखेडा येथील सब स्टेशन परीसरात अचानक ट्रिपिंगमुळे मंगळवार, 30 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले नाही. कुंभारखेडा कक्षांतर्गत गौरखेडा सब स्टेशन वर अचानक तारांमध्ये ट्रीपिंग झाल्याने शॉर्टसर्किट होऊन अचानक सब स्टेशन परीसरात कोरडे गवत असल्याने आग लागली. त्यावेळेस सब स्टेशन येथे सिनिअर ऑपरेटर आर.आर.चौधरी हे ड्युटीवर हजर होते. आग लक्षात येताच त्यांनी व गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांनी वीज कर्मचारी गुरुदास पाटील, राजू भिलाला, नारायण तायडे यांना फोन करून बोलावले. गौरखेडा गावातील ग्रामस्थ मंडळी ही लगेच आग विझविण्यासाठी आले. या सर्वांच्या सहकार्याने लवकरच आग विझवून आटोक्यात आणली. आग गौरखेडा गावात न पसरता मोठा अनर्थ टळला. एकच फायर गॅस सिलेंडर असल्याने आग विझवताना अडचणी आल्या.

अधिकाधिक सिलिंडर हवेत
कुंभारखेडा कक्षाचे कनिष्ठ अभियंता विशाल नेमाडे म्हणाले की, आग विझवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसून गौरखेडा सब स्टेशनला आग विजवण्यासाठी लागणारे फायर गॅस सिलेंडर हे कमीत कमी चार ते पाच उपलब्ध करण्यात यावे, जेणेकरून सब स्टेशनवर जर मोठी आग लागली तर आग विझवण्यासाठी ते उपयोगी येईल.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !