भुसावळात शिवसेना व सार्वजनिक उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन


शिवभोजन केंद्रातर्फे गरीबा बांधवांना अन्नदान

भुसावळ : शिवसेना व सार्वजनिक उत्सव समितीतर्फे बुधवार, 31 मार्च रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे विधीवत पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स राखत रेल्वे स्थानकानजीक असलेल्या पूर्णाकृती पुतळयाचे पूजन करण्यात आले. दरम्यान, शिवभोजन केंद्र संचालक व कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या तर्फे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते गरीबांना अन्नदान करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांच्यासह सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, नगराध्यक्ष रमण भोळे, युवराज लोणारी, शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष निलेश महाजन, उपाध्यक्ष जाकिर पेंटर, शिवसेना नगरसेवक, सभापती मुकेश गुंजाळ, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, परीक्षीत बर्‍हाटे, किरण कोलते, सतीश सपकाळे, अरुण थोरात, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक गौरव शर्मा, मनीष अग्रवाल, धीरज वरढोणकर, खुशाल जोशी, प्रवीण ईखणकर, बबलू खान, मधुकर परसारे तसेच शिवप्रेमी, शिवभक्त व शिवसैनिक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !