भुसावळ विभागातील 33 कर्मचारी सेवानिवृत्त


भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून 31 रोजी 33 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्‍यांना रेल्वेतर्फे सात कोटी 92 लाख त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा यथोचीत सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे करण्यात आले तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणून,न नांदगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, बडनेरा, बर्‍हाणपूर आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोल्डर दिलेत. सेवानिवृत्तीबद्दल कर्मचार्‍यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूल प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले. निपटान, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी यांनी परीरश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !