दगडी गावातून चोरट्यांनी म्हैस लांबवली
यावल : तालुक्यातील दगडी मनवेल येथील वसंत बाबुलाल कोळी यांच्या मालकीची सुमारे एक लाख रुपये किंमतीचे म्हैस चोरट्यांनी लांबवल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने पशूपालकांमध्ये भीती पसरली आहे. 31 मार्च रोजी सकाळी म्हशीची चोरी झाल्याची बाब उघड झाली. दगडी मनवेल येथील शेतमजुर बाबुलाल कोळी यांचा जनावरांचा गोठा असून गाोठ्यामध्ये वसंत कोळी हे जनावरांना वैरण टाकून झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी गोठ्यात प्रवेश करून म्हैस चोरुन नेली. या घटनेनंतर दगडी व परिसरातील गावांमध्ये जनावरांचे गोठे असलेल्या शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.





