भुसावळकरांनो सावधान ! : एकाच दिवसाच पाच रुग्णांचा मृत्यू : 169 बाधीत आढळले


भुसावळ : शहरात नुकताच तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रुग्ण संख्येचा आलेख कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून 169 बाधीत आढळल्याने चिंता व्यक्त होत होत तर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 1142 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 1653 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 91 हजार 327 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 77 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 1222 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

हे देखील वाचा : कोरोना सुसाट : पुन्हा 15 जणांचा मृत्यू तर 1142 बाधीत आढळले




भुसावळात आतापर्यंत 243 रुग्णांचा मृत्यू
भुसावळात आतापर्यंत सात हजार 639 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 243 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 6189 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार 207 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गुरुवारी एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू ओढवला असून तब्बल 169 बाधीत रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. गुरूवारी भुसावळ तालुक्यातील 36, 51 व 68 वर्षीय पुरूष व 45 व 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

पालिकेकडून कठोर अंमलबजावणीची अपेक्षा
शहरातील बाजारपेठ, किराणा दुकाने, हॉटेल्स, बार आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा गर्दीच्या ठिकाणावर पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्स न पाळणार्‍यांसह मास्क न लावणार्‍यांवर कठोर कारवाई गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !