कृषी पंपावरील संपूर्ण वीज बील माफ करा


यावलमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

यावल : कोरोना विषाणू संसर्गामुळे आधीच आर्थिक संकटात आलेल्या शेतकर्‍यांच्या कृषी पंपावरील संपूर्ण वीज बील तत्काळ माफ करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. सावदा, तालुका रावेर येथील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांना याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष व डोंगर कठोरा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सरोदे, उपाध्यक्ष अमित सरोदे, तालुकाध्यक्ष आशिष बोरोले, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता यांची भेट घेवुन निवेदन दिले. राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना लिहिलेल्या लेखी निवेदनात शेतकर्‍यांची सध्याची परीस्थिती कोरोना महामारी, अचानक झालेली अतिवृष्टी, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे तिहेरी संकटात ओढले गेलेले शेतकरी बांधवांची परिस्थिती अतिशय नाजुक झालेली आहे. या दृष्टीकोणातुन शासनाने त्यांचे कृषी पंपावरील संपूर्ण वीज बील माफ करावे तसेच कृषी पंपाची वीज तोडणी तत्काळ थांबवावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !