भुसावळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुदाम सोनवणे
भुसावळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृह येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक उत्साहात पार पडली.
भुसावळ शहर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुदाम सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव कोरोना संबंधी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन जयंती उत्सव साजरी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या निवडीप्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक रवी सपकाळे, नगरसेवक उल्हास पगारे, लक्ष्मण जाधव, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र निकम, ज्येष्ठ नेते मोहन निकम, माजी अध्यक्ष बाळा डिगंबर सोनवणे, माजी समिती अध्यक्ष योगेश तायडे, गिरीश तायडे, नगरसेवक राजकुमार खरात यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शहर उत्सव समिती अध्यक्ष निवडीप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बाळा पवार, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, बाळा मोरे, राष्ट्रीय मजदुर सेनेचे अध्यक्ष राजु डोंगरदिवे, विश्वास खरात, अनुप खोब्रागडे, सुरेश यशोदे, प्रकाश सोनवणे, सुनील ढिवरे, पप्पु सुरळकर, प्रकाश सोनवणे, मुन्ना सोनवणे, रुपेश सांळुके, गणेश जाधव, श्रीकांत वानखेडे, अॅड. सुनिल पगारे, विशाल सोयंके, सुनील जोहरे, सिध्दार्थ सोनवणे, भगवान निरभवणे, तुषार जाधव, अल्केश मोरे, शुभम सोयंके, राजु तायडे, सुनील रायमोळे, किरण चव्हाण, वैशाली हिरोळे, अंजना निरभवणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




