15 व्या वित्त आयोगातून कोरोना उपाययोजनांसाठी परवानगी द्यावी
रावेरात गटविकास अधिकार्यांना सरपंच संघटनेने दिले निवेदन
रावेर : रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास अधिकारदीाली कोतवाल यांच्याकडे केली आहे. ऑक्सिजन वेळेवर न मिळल्यामुळे अनेक रुग्णांचा मूत्यू होत आह तसेच रावेर ग्रामीण ऑक्सिजन सेंटर बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना पेशंटच्या रुग्णांचे हाल होत असून रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्याकडे केली आहे.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
दरम्यान गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना निवेदन देतांना सभापतींचे पती हरलाल कोळी, उपसभापतींचे पती संदीप सावळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, सचिव महेंद्र पाटील, सरपंच गणेश महाजन, सरपंच नीळकंठ चौधरी, श्रीकांत महाजन, किर्ती पाटील, योगेश पाटील, अमोल पाटील, स्वप्नील पाटील, धनराज पाटील, मंगल वाघोदे आदी सरपंच उपस्थित होते.




