ग्रामीण रुग्णालयास दिल्या 1500 सलाईनच्या बाटल्या भेट
वरणगावचे डॉ.नी.तू.पाटील यांचा भाजप स्थापनादिनी उपक्रम
भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमधील डीसीसीएचमध्ये 100 मिली सलाईनचा स्टॉक उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान व भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी भाजप स्थापना दिनानिमित्त 1500 सलाईन केंद्राला भेट दिल्या. यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे.
यांची होती उपस्थिती
ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना बाधीत असताना डॉ. नी. तू. पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले होते. या दरम्यान तेथे 100 मिलीची सलाईन बॉटल नसल्याचे वास्तव्य समोर आले. रेमडेसीवीर अथवा अँटिबायोटिक, स्टिरॉइड्स इंजेक्शन देताना 100 मिलीच्या सलाईनमधून द्यावे लागते. मात्र उपलब्धता नसल्याने 500 मिलीच्या सलाईन ने देतांना भरपूर वेळ लागत होता. शिवाय रुग्णांना हात सतत एकाच ठिकाणी ठेवावा लागतो. याच दरम्यान इतर रुग्णांना उपचारासाठी विलंब होतो. यामुळे भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून भाजप वैद्यकिय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 एमएलच्या 1500 सलाईनचे बॉटल्स भेट दिल्या. यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि. तु. पाटील, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ.शुभांगी पाटील, डॉ.निखील चौधरी इलियास शेख आदी उपस्थित होते.




