18 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1143 रुग्ण आढळले


आतापर्यंत कोरोनामुळे 1827 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1044 रुग्णांची मात

जळगाव : जिल्ह्यात 24 तासात मात्र पुन्हा 1143 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 18 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1827 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख चार हजार 152 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 90 हजार 504 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 1044 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांपुढे पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 296
जळगाव ग्रामीण 44
भुसावळ 99
अमळनेर 31
चोपडा 90
पाचोरा 43
भडगाव 04
धरणगाव 55
यावल 33
एरंडोल 12
जामनेर 58
रावेर 83
पारोळा 38
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 197
बोदवड 53
अन्य जिल्हा 07





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !