नगरसेवकांचे दातृत्व : भुसावळात रुग्णांसाठी मोफत रिक्षा सुविधा
भुसावळ : शहरात शनिवारी विकएण्ड लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट असल्याची बाब लक्षात घेता रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना वाहने मिळत नव्हती. ही स्थिती लक्षात घेऊन नगरसेवक निर्मल कोठारी यांनी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी दहा रीक्षांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे सध्या रुग्णवाहिकांची सेवा मिळत नाहीत. यामुळे आपत्कालिन स्थितीत रुग्णांना वाहन मिळत नाही. तर शनिवारी शहरात कडक लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांनाही वाहने मिळत नाहीत. यामुळे नगरसेवक निर्मल कोठारी यांनी 10 रीक्षांची सुविधा दिली आहे. या दहा रीक्षांच्या चालकांचे संपर्क क्रमांक त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. शहरातील कोणत्याही भागातून हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी या रीक्षांतून रुग्णांना मोफत सुविधा देण्यात आली तसेच मंगळवारी व बुधवारीदेखील सुविधा दिली जाणार असल्याचे पिंटू कोठारी म्हणाले. रीक्षा चालकांना रुग्णांना खाजगी दवाखान्यासह नगरपालिका रुग्णालय, ट्रॉमा सेंटर आदी ठिकाणी सोडून पुन्हा घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रशासकीय मान्यता घेवून अन्य काही दिवस सुविधा पुरवण्याबाबत निर्णय घेवू, असेही ते म्हणाले.



