भारतीय जनता पार्टीची भुसावळ शहर नूतन कार्यकारीणी जाहीर
शहराध्यक्षपदीपदी परीक्षीत बर्हाटे : तीन सरचिटणीसंसह सहा उपाध्यक्षांचा कार्यकारीणीत समावेश
भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराची नुतन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
शहराध्यक्षपदी परीक्षित पुंडलिक बर्हाटे सर्वानुमते निवड करण्यात आली तर नवीन कार्यकारीणी तीन सरचिटणीसांसह सहा उपाध्यक्षांचा समावेश करण्यात आला. भविष्यात पक्षाने दिलेल्या विविध जबाबदार्या,त्याच प्रमाणे समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विविध लोकाभिमुख योजना पोहचविण्याचे कार्य त्याचप्रमाणे राष्ट्रहित, पक्षवाढीसाठी कार्य करणार असल्याचा दावा नूतन पदाधिकार्यांनी दिला.

अशी आहे नूतन कार्यकारीणी
शहराध्यक्ष परीक्षित पुंडलिक बर्हाटे, सरचिटणीस- रमाशंकर रामप्यारे दुबे, अमोल अरविंद महाजन, संदीप पंडितराव सुरवाडे, उपाध्यक्ष- चंद्रशेखर चुडामण इंगळे, निक्की रमेश बतरा, राजेश सुगनचंद सुराणा, बिसन कालूजी गोहर, प्रीतमा गिरीश महाजन, विशाल सतीश जंगले, चिटणीस गिरीश पंडित पाटील, सोनी संतोष बारसे, रेखा सुनील सोनवणे, मुकुंदा निमसे, संजय दांडगे, प्रशांत सुरेश देवकर, जितेंद्र पाचपांडे, कोषाध्यक्ष नारायण प्रल्हाद रणधीर.
22 निमंत्रीत सदस्य
दरम्यान, या कार्यकारीणीत 22 निमंत्रीत सदस्यांचा सहभाग करण्यात आला आहे. त्यात आमदार संजय सावकारे, मदन जोशी, अरुण भावसार, अशोक सुराणा, जयंतीलाल सुराणा, अजय भोळे, प्रमोद सावकारे, चंद्रशेखर अत्तरदे, मनोज बियाणी, डॉ.नि.तु.पाटील, सुरेश शर्मा, लक्ष्मण सोयंके, वासुदेव बोंडे, महेंद्रसिंग ठाकूर, अलका शेळके, मीना लोणारी, शैलजा पाटील, मेघा जोशी, खुशाल जोशी, राजू खरारे, पवन बुंदेले, अॅड.प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
