भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शहराध्यक्षदी केशव भाई गेलानी
भुसावळ : गुढीपाडवा व झुलेलाल जयंतीचे औचित्य साधून नवीन वर्षानिमित्त भुसावळ शहरातील झुलेलाल मंदिरात भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शहरध्यक्षदी केशव भाई गेलानी यांची बहुमताने निवड करण्यात आली. यावेळे माजी पालकमंत्री व आमदार भाऊ सावकारे व भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर, माजी नगरसेवक निक्की बत्रा, अजय सेठ नागराणी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकसेठ नागराणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अजयभाई माखीजा, झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष नारयण दास छाबडा, किशोर कारडा, मनोहर सोधाई, देवीलाल सीरवानी, संजय आहूजा, पहलाज मूल चांदणी, जॉनी मेघांनी, अनिल रोहिडा, अमित आहुजा व व्यापारी बांधवांची विशेष उपस्थिती होती.
