भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने गुढीपाढव्याला दाम्पत्याचे मनोमिलन


भुसावळ : विवाहाच्या वर्षभरानंतर दाम्पत्यात कुठल्यातरी कारणावरून खटके उडाले मात्र संतापाच्या भरात महिलेने तान्हुल्याला सोबत घेत माहेर गाठले व काही दिवसांनी येथील भोर पंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला मात्र समुपदेशन कक्षात किर्ती व भूषण दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन केल्या नंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचा संसार आता गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला पूर्वपदावर आला आहे.

भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने टळला घटस्फोट
आसोदे येथील भूषण चिरमाडे व गोजोरे येथील किर्ती उर्फ भारती यांचा 2018 मधे विवाह झाला मात्र विवाहानंतर एक वर्ष सर्व चांगले सुरळीत चालू होते. पण हळू-हळू त्यांच्यात वाद विवाद सुरू असताना दाम्पत्याच्या संसार वलेीवर फुल उमलले. वादानंतरच्या भांडणात किर्तीने बाळाला घेऊन माहेर गाठले व नंतर घटस्फोटासाठी अर्ज केला. भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव डॉ. बाळू पाटील व अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर बाबाींची/ कागदपत्रांची पुर्तता करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी, सदस्य मंगला पाटील व जयश्री चौधरी यांच्या उपस्थितीत दाम्पत्यात मनोमिलन घडवून आणले व उभयंतांनी संसार करण्याचे मान्य केल्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किर्तीयची सासरी पाठवणी करण्यात आली. किर्ती व भूषणाला सर्व सदस्यांनी आशिर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !