रावेरात कारवाईसाठी मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर


रावेर : कोरोनाची ‘ब्रेक दि चैन’ तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर रावेर शहरात याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वता: मुख्यधिकारी रवींद्र लांडे रस्त्यावर उतरले आले. मुख्य मार्केटमध्ये असलेले फळ विक्रेते भाजीपाला विक्रेत्यां जवळील गर्दी कमी करण्यासाठी त्यांना वेग-वेगळ्या ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेने सुमारे पंधरा जागा निश्चित केल्या आहे. बुधवारी रात्री आठवाजेपासून संचारबंदी लावण्यात लावण्यात आल्यानंतर गुरुवारी मुख्यधिकारी रवींद्र लांडे, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोलिस कर्मचारी व पालिकेचे कर्मचार्‍यांनी ावेर शहरात पोलिस स्टेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, मेन रोड, पाराचा गणपती आदी ठिकाणी फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते यांना गर्दी कमी करण्याच्या सूचना केल्या तसेच सोबत सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करावे तसेच सर्वांनी अँटीजन टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहरात 58 कोरोना अ‍ॅक्टीव्ह
रावेर शहरात कोरोना व्हायरसचे 58 कोरोना रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून कोविड सेंटर मध्ये 80 जण दाखल आहेत. ही साखळी तोडण्यासाठी शहरात मुख्याधिकारी रवींद्र लांडे एक्शन प्लानवर काम करताय. शहरात विना माक्क विना कारण फिरणार्‍या सुमारे 100 व्यक्तीची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी शहरात पालिकेचे प्रमोद चौधरी, मयूर तोंडे, दीपक देशमुख, विजय महाजन, सुभाष महाजन, यूसुफ शेख, प्रकाश शिंदे आदी पालिकेचे कर्मचारी फिल्डवर फिरत होते.



विक्रीसाठी इतर 15 जागा निश्चित
रावेर शहरात पालिकेने भाजीपाला व फळ विक्रीते यांना गर्दी होणार्‍या ठिकाणा वरुन उठवुन शहरातील साईं नगर, पोलिस कवायत, संभाजी नगर, उटखेडा रोड, इदगाह रोड, भगवती नगर यासह 15 जागा निश्चित केल्या आहेत. येथे फळ व भाजी पाला विक्री करू शकणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !