विना मास्क फिरणार्‍या 22 जणांकडून 11 हजारांचा दंड वसूल


जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी अचानपणे सरप्राईज विझीट देत विना मास्क फिरणार्‍या तसेच शासन आदेशानुसार सुरु असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये विना मास्क काम करणार्‍या अशा एकूण 22 जणांवर प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून एकूण 11 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाईने उडाली खळबळ
जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यात कोरोनाने मृत्यू होणार्‍यांची संख्या पाहता चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्रीपासून शासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जळगाव शहरातही या आदेशाची जिल्हाधिकारी यांच्याकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरातील गोलाणी मार्केट येथे आज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सोनार, कर्मचारी रतन गीते, संजय झाल्टे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रज्ञेश ठाकूर आदींनी पाहणी केली. या मार्केटमध्ये विना मास्क फिरणार्यांवर तसेच ज्या खाजगी आस्थापना सुरु आहेत, त्यात विना मास्क काम करणार्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकाकडून 500 याप्रमाणे 11 हजारांचा दंड या कारवाईतून वसूल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !