सावखेडासीम येथे महिलेचा विनयभंग
यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील 22 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील सावखेडासीम येथील 22 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियासह राहते. 15 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सावखेडा-दहिगाव रोडवर शौचालयास जात असतांना गावातील कुरबान अकबर तडवी याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार असलम खान दिलवर खान करीत आहे.



