धक्कायक : 20 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1033 रुग्ण आढळले


आतापर्यंत कोरोनामुळे 1888 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1103 रुग्णांची मात

जळगाव : जिल्ह्यात 24 तासात मात्र पुन्हा 1033 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 20 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1888 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सात हजार 103 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 93 हजार 976 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 1103 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांपुढे पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 212
जळगाव ग्रामीण 58
भुसावळ 130
अमळनेर 105
चोपडा 87
पाचोरा 87
भडगाव 10
धरणगाव 53
यावल 30
एरंडोल 49
जामनेर 19
रावेर 84
पारोळा 27
चाळीसगाव 37
मुक्ताईनगर 32
बोदवड 01
अन्य जिल्हा 20



24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

जळगाव शहरातील 48, 86, 88 वर्षीय पुरूषाचा व 70 वर्षीय महिलेचा

यावल तालुक्यातील 80 व 82 वर्षीय पुरूष व 60 व 64 वर्षीय महिलेचा

अमळनेर तालुक्यातील 73 वर्षीय पुरूषाचा व 35 व 65 वर्षीय महिलेचा

चोपडा तालुक्यातील 41 वर्षीय पुरूष व 70 वर्षीय महिलेचा

रावेर तालुक्यातील 30 व 60 वर्षीय महिलेचा

जामनेर तालुक्यातील 45 वर्षीय पुरूषाचा व 26 वर्षीय महिलेचा

भुसावळ तालुक्यातील 43 वर्षीय पुरूषाचा

एरंडोल तालुक्यातील 65 वर्षीय पुरूषाचा

भडगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !