यावलच्या वृद्धेवर अंत्यसंस्कारासाठी शिवाजीनगरवासी सरसावले


यावल शहरात घडून आले माणुसकीचे दर्शन

यावल : शहरातील शिवाजी नगरात राहणार्‍या गंगुबाई शेनफडू महाडिक या गेल्या दहा वर्षापासून त्यांच्य पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह कसातरी त्या चालवत होत्या. शिवाजीनगर मधील लोक त्यांना कायम त्यासाठी सहकार्य करत. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, मूलबाळ किंवा त्यांच्यामागे कोणीही नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी शिवाजीनगरवासीयांनी पार पाडली. त्यात प्रामुख्याने नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले व त्यांच्या सहकारी यांनी अंत्यविधी विधीवत पार पाडून मृत गंगुबाई महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

नगरसेवकांचे सहकार्य
गंगुबाईच्या निधनाची वार्ता समजल्याबरोबर शिवाजी नगरातील तरुण यांनी प्रा. मुकेश येवले डॉ. हेमंत येवले यांच्या कानावर ही गोष्ट टाकली त्यांनी लगेच आपल्या सहकार्‍यांसह गंगुबाई च्या घरी जाऊन त्यांच्या अंत्यविधीची संपूर्ण तयारी केली. अंत्यविधीसाठी शहाजीराव येवले, योगेश वाणी, गणेश कोल्हे, मोहन भगत, पंकज रोहम, बापू जासूद, श्रीरंग वाघ, नितीन चव्हाण, शशी यादव, गोपाळ मेंढरे, राजू भोईटे, कैलास अलोने,विलास येवले, चंद्रकांत येवले शशी रोहम, अशोक येवले, गोपाळ काकडे, सागर सूर्यवंशी, विलास कदम, संजय चव्हाण तुषार येवले, विकास मराठे आदींनी परिश्रम घेतले तर अग्नीडाग प्रकाश सूर्यवंशी यांनी दिला. गंगुबाईंना वारस नसताना शिवाजीनगर मधील लोकांनी त्यांचा अंत्यसंस्कार विधिवत आणि शासनाचे नियम पाळून पार पाडल्यामुळे परत एकदा यावल शहरात माणुसकीचे दर्शन घडवले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !