मुक्ताईनगर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आमदारांनी घेतला आढावा


मुक्ताईनगर : मार्च महिन्यापासुनच उन्हाळा सुरू झाला असून दुपारच्या वेळेस कडक उन्हामुळे घाम निघत आहे. यावर्षी उन्ह्याळ्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासनाचे वतीने तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईच्या वतीने कृृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यत तालुक्यातील काकोडा, वडगाव, राजुरा, बोरखेडा जुने या गावांमध्ये पाणीटंचाई भासणार म्हणुन प्रत्येक गावात एक खाजगी विहीर अधिग्रहणासाठी प्रत्येकी 72 हजार प्रमाणे एकूण दोन लाख 88 हजारांची तरतुद करण्यात आलेली होती. एप्रिल ते जून 2021 या कालावधीत तालुक्यातील खामखेडा, हलखेडा, लालगोटा, वायला , चिंचखेडा खुर्द येथे विहीरी अधिग्रहणासाठी 2 लाख 16 हजाराची तरतुद करण्यात आलेली आहे. तरोडा, भानगुरा, सातोड, धुळे, भोटा या गावात संभाव्य पाणीटंचाई असणार असून संभाव्य टंचाई उपाययोजनेसाठी शुक्रवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

यांची होती उपस्थिती
तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळुंके, आरोग्य सहायक अधिकारी डॉ.अर्जुन काळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी आर.एल.जैन, जिल्हा परीषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता विसपुते, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !