बोरघाटात रस्त्यावर झाड टाकून दुचाकीस्वाराला लूटले


बाप-लेकांकडील चार हजारांच्या रोकडसह मोबाईल लांबवला : सावदा पोलिसांकडून तपासाला वेग

सावदा : दुचाकीने पालकडे निघालेल्या पित्रा-पूत्रांना बोरघाटात रस्त्यावर झाड टाकून लुटण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बोर घाटात घडली. तीन ते चार संशयीत दरोडेखोरांनी दुचाकीच्या डिक्कीतील चार ते पाच हजारांची रोकडसह एक मोबाईल लांबवला. या घटनेने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली असून सावदा पोलिसात शनिवारी सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले म्हणाले. दरम्यान, दरोडेखोरांचा शोधासाठी तक्रारदारांच्या माहितीनुसार संशयीतांची माहिती काढली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रस्त्यावर झाड टाकून धमकावले
सूत्रांच्या माहितीनुसार, लिलाधर भंगाळे व जयेश भंगाळे हे दुचाकीने शुक्रवारी रात्री बोर घाटातून पालकडे निघाले असताना तीन ते चार संशयीत दरोडेखोरांनी रस्त्यावर झाड आडवे ठाकून भंगाळे यांना थांबवले. तुमच्याकडील जो काही किंमती ऐवज आहे तो काढून द्यावा, असे धमकावत त्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील चार ते पाच हजारांची रोकड व मोबाईल लांबवत पोबारा केला. या दरोड्यानंतर रस्त्याने रात्री-बेरात्री कामानिमित्त वाहनाद्वारे ये-जा करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी या भागात गस्त वाढवून दरोडेखोरांना अटक करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !