वरणगाव भाजपाचे शहर उपाध्यक्ष शे शोएब शे.शकील यांचे उपचारादरम्यान निधन
वरणगाव : येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ यांचे नातू तथा वरणगाव भाजपा शहरउपाध्यक्ष शेख शोएब शेख शकील (27) यांचे नुकतेच निमोनियाच्या आजाराने जळगाव येथील टायटन हॉस्पिटल येथेेगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्याची मुलगी, आजोबा हाजी अल्लाउद्दीन सेठ, वडील शकील शेख, आई, एक, भाऊ, काका असा मोठा परीवार आहे. शेख शोएब यांच्या निधनानंतर माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांनी शोककळा व्यक्त केली.



