कोरोना :राज्यात 48 तासात 360 रुग्णांचा मृत्यू तर राज्यात 66 हजार 191 बाधीत आढळले
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच असल्याने सरकार व प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात रविवारी 66 हजार 191 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली असून आज 61 हजार 450 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज नोंद झालेल्या 832 मृत्यूंपैकी 360 मृत्यू मागील 48 तासातील तर 244 मृत्यू मागील आठवड्यातील व उर्वरीत 228 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासात 5542 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर आठ हजार 478 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.