संतापजनक : दहा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार
नवी दिल्ली : दहा वर्षीय बालिकेवर सात जणांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना हरीयाणातील रेवाडीत 24 मे रोजी घडली. पीडित मुलीच्या शेजारच्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी मुलीच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात 9 जून रोजी धाव घेतली. या गुन्ह्यात सात आरोपींपैकी केवळ एक वयस्क असून इतर आरोपींचे वय 10-12 वयोगटातील आहे. मुलीच्या शेजार्यांनी व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यात मुलीवर गँगरेप झाल्याचं उघड झालं. या 7 आरोपींपैकी चार अल्पवयीन हे मुलीचे नातेवाईक आहेत. ज्या लोकांनी हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला यांचाही पोलीस शोध घेत आहेत.