माजी गृहमंत्री देशमुखांच्या नागपूरसह मुंबईतील निवासस्थानी ईडीचा छापा
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानानंतर मुंबईतील निवासस्थानी देखील सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शुक्रवार, 25 रोजी सकाळी आठ वाजताच ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले असून अनिल देशमुख सध्या नागपूर आणि मुंबईतही नाहीत ते पुण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागपूरासह मुंबईत छापेमारी
मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे. याठिकाणी ईडीचे पाच ते सहा अधिकारी दाखल झाले आहेत तर देशमुखांच्या नागपूरातील घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकार्यांनी छापा टाकला होता.

