फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल ; संन्यासाची भाषा शोभत नाही -खासदार संजय राऊत


मुंबई : देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे, त्यांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर राऊत बोलत होते. राज्यात आताच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला सत्ताधारी व विरोधक यावरून एकमेकांवर टिकेची तोफ डागताना दिसून येत आहेत.

फडणवीसांच्या वक्त्यावर राऊत म्हणाले, अशी भाषा शोभत नाही
शनिवार, 26 जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी नागपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले होते. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे म्हटले असून ते लढवय्ये नेते आहेत, त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !