नशिराबाद नगरपरीषदेसाठी अधिसूचना जारी
नशिराबाद : नशिराबाद येथे नगरपरीषद अस्तित्वात आली असून याची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली असून जळगावच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. येथे आता अन्य नगरपालिकांसोबत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येथे नगरपरिषदेच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जून महिन्याच्या अखेरीस नगरपरीषद होणार असल्याचे सूतोवाच केले होते.

