40 हजारांची लाच भोवली : सहायक वन संरक्षक एसीबीच्या जाळ्यात


नाशिक : शेतजमीन निर्वनीकरण झाल्याचा कामाचा अहवाल देण्यासाठी 40 हजारांची मागणार्‍या संगमनेर सहा वन संरक्षक कार्यालयातील सहायक वन संरक्षक विशाल किसन बोराडे (40 वर्ष, फ्लॅट नं 2, हनुमान शरण अपार्टमेंट, संगमनेर, मुळ राहणार मु.पो.घोडेगाव, ता.आंबेगाव, जि. पुणे) यास नाशिक एसीबीच्या पथकाने आळेफाट्यावर लाच स्वीकारताच अटक केली.

नाशिक एसीबीने केला सापळा यशस्वी
आळेफाटा येथील 27 वर्षीय तक्रारदार यांच्या मावसभावाची डोळासणे, ता. संगमनेर येथील पूर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण (Deforestation) झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविण्यासाठी आरोपी विशाल बोरोडे यांनी 40 हजारांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यावर सापळा रचण्यात आला. आळे फाट्यावर तक्रारदाराने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, विजय गंगूल, रवींद्र निमसे, चालक पोलीस हवालदार हरूण शेख आदींनी हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !