प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम


भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 5 रोजी यावल शहरात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब-गरजू शेतमजूरांना पत्र्यांचे वाटप, रुग्णवाहिकेचे लोकार्पण, विधवा माता भगिनींना एक हजार जीवनावश्यक किटचे वाटप, 10 अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणार, 15 दिवसांच्या बाळाच्या शस्त्रक्रीयेसाठी आर्थिक मदत, विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, रुग्णांना फळवाटप, निराधारांना जेवण, वृध्दाश्रमात अन्नदान, कोविड योध्दा पुरस्कारचे वितरण, विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.




आपणही लागतो समाजाचं देणे : अनिल चौधरी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा सोमवार, 5 जुलै रोजी वाढदिवस असल्याने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !