दोघा युवकांची तलवारीने हत्या
पुणे : दौंड तालुक्यातील पाटसच्या परीसरातील तामखंडा येथील भानोबा मंदीरासमोर दोघा तरुणांची हत्या करण्यात आल्याची खळबळ उडाली. रविवार, 4 जुलै रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. दरम्यान, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत. फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला तरुण गेले असता ही घटना घडली. शिवम संतोष शितकल (23) व गणेश रमेश माखर (23, दोघेही रा. पाटस , अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत. हल्लेखोर पसार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. संशयीत आरोपींनी शिव्या दिल्यानंतर तरुण जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यावर तलवार व दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आली.