भाजपाचे आमदार गिरीश महाजनांसह 12 आमदारांचे निलंबन
तालिका अध्यक्षांना शिविगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कारवाई
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. त्यात आशिष शेलार, माजी जलसंपदा मंत्रीगिरीश महाजन यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
तालिका अध्यक्षांना शिविगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कारवाई



या आमदारांचे निलंबन
1. संजय कुटे
2. आशिष शेलार
3. गिरीश महाजन
4. पराग अळवणी
5. राम सातपुते
6. अतुल भातखळकर
7. जयकुमार रावल
8. हरीश पिंपळे
9. योगेश सागर
10. नारायण कुचे
11. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
12. अभिमन्यू पवार
आजचा दिवस काळा : भास्कर जाधव
काही आमदारांनी मला आई- बहिणींवरुन शिवीगाळ केली. माझ्या अंगावर धावून आले, असं सांगताना आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस असल्याचे सांगत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला तसेच भाजपाच्या आमदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधा पक्षाने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

