कोरोनामुक्त भागात शाळेची घंटा वाजणार
मुंबई : कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनामुक्त भागामध्ये पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. या भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असलेतरी शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
कोरोना नियमांचे करावे लागणार पालन
शाळा सुरू झाल्यावर शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बेंचवर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच त्यांना सतत हात धुवावे लागतील.