माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्हाटेला अटक
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आल्याने पोलिसांनी त्यास अटक केली. जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देण्यात होत यशस्वी झाला होतहा. बर्हाटे याची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्हाटे यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अॅड.सुनील मोरे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र बर्हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बर्हाटे याचा शहर पोलीस दलाकडून शोध सुरू असलातरी आरोपी मात्र गवसत नव्हता. रवींद्र बर्हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.