ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (98) यांचे हिंदुजा रूग्णालयात बुधवारी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. दिलीप कुमार यांचे पार्थिव रूग्णालयातून त्यांच्या पाली हिल स्थित घरी नेण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.

सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचं निधन हा संपूर्ण सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी दिलीप कुमार यांनी आपल्या दोन भावांना गमावलं आहे. 88 वर्षांचे असलम खान आणि 90 वर्षांचे एहसान खान यांच कोरोनामुळे निधन झालं होतं. यामुळे दिलीप कुमार यांना आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नव्हता.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !