राजधानीतील सीबीआयच्या मुख्यालयास आग
नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली असून लागलीच सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दलाच्या पाच गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप कळू शकली नाही. सीबीआय मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असून आगीमुळे काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण स्पष्ट होवू शकलेले नाही.
New Delhi | Smoke emanating was due to short circuit in the generator in the CBI building. No fire & damage to properties were reported. After smoke, an automatic sprinkler system was activated. The functioning of the office will be restored in some time: CBI officer pic.twitter.com/5mRnU6c5B3
— ANI (@ANI) July 8, 2021



