यावलमधील दरोड्याची लवकरच होणार उकल : आमदार चंद्रकांत पाटील
यावलमधील सराफा व्यावसायीकाची भेट घेत दिला धीर
यावल : शहरातील सराफा गल्लीतील जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानात गुरूवारी दुपारी एक वाजता बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी सराफा दुकान लुटत साडे अकरा लाखांचा ऐवज लांबवला होता. घटनेच्या अनुषंगाने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सराफा व्यावसायीक जगदीश कवडीवाले यांची भेट घेत त्यांना धीर दिला. दरोड्याची माहिती मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कळवण्यात आली असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास आमदारांप्रसंगी व्यक्त केला.




दरोड्याची मुख्यमंत्र्यांना दिली माहिती
आमदार पाटील यांनी जगदीश कवडीवाले यांची शुक्रवारी भेट घेत नेमकी घटना जाणून घेतली. ते म्हणाले की, दरोड्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावरही ही बाब आपण टाकल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दरोड्याची बाब गांभीर्याने घेतली असून या संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांना चौकशी करून तत्काळ आरोपींचा शोध घ्यावा, असे आदेश दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हणाले. सोन्याचे दागिने गेले याचे दुःख असलेतरी सुदैवाने सोन्यासारखी आपली माणसे वाचली, असेही आमदार म्हणाले. ज्या युवकांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा धाडस दाखवले देखील विशेष कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले.

