संतापजनक : मृतदेहावर दोन दिवस उपचार : डॉक्टरांना पडल्या बेड्या
सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला मृतदेहावर तब्बल दोनदिवस उपचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डॉ.वाठारकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. डॉ.वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परीरसरात आधार हेल्थ केअर सेंटर असून 24 फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( 0) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सायरा यांचा नॉन कोविड उपचारादरम्यान 8 मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. दोन दिवसांनी डॉ.वाठारकर याने नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना 10 मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून 41 हजार 289 इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला.