नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौर्‍यावर


जळगाव : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, 10 जुलै 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. शनिवार, 10 जुलै, 2021 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईहून निघाल्यानंतर जळगावात दुपारी 12 वाजता आगमन व त्यानंतर 12.15 वाजता माजी आमदार चंद्रकांत सोनवणे याच्या जयकिसनवाडी येथील निवासस्थानी सात्वंन भेट, दुपारी 12.30 वाजता जळगाव महानगरपालिका येथे भेट व आढावा त्यानंतर दुपारी एक वाजता जळगाव येथून शिरसोली-वावडदा-सामनेर-नांद्रा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या घरी भेट त्यानंतर दुपारी 1.45 वाजता पाचोरा येथून भडगाव शहराकडे प्रयाण, दुपारी दोन वाजता भडगाव नगरपरीषदेने नवीन बांधलेल्या कै. शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा व दुपारी 2.15 वाजता भडगाव नगरपरीषदेने नवीन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प (डपिंग ग्राऊंड) लोकार्पण सोहळा तसेच दुपारी तीन वाजता भडगाव शहरातील बाळद रोड येथील साईबाबा मंदिरास सदिच्छा भेट व दुपारी 3.10 वाजता भडगाव येथून पाचोरा शहराकडे प्रयाण तसेच दुपारी 3.20 वाजता पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा, दुपारी 3.30 वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा, दुपारी 3.40 वाजता पाचोरा शहरातील पांचाळेश्वर मंदिराजवळील हिवरा नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा, दुपारी 3.50 वाजता पाचोरा शहरातील स्मशानभूमी जवळील हिवरा नदीवरील पुलाचा भुमीपूजन सोहळा, दुपारी चार वाजता पाचोरा शहरातील माजी मंत्री स्वर्गीय के.एम.बापू पाटील व्यापारी संकुल, भाजीमंडई लोकार्पण सोहळा, दुपारी 4.45 वाजता पाचोरा येथून नांद्रा-सामनेर-वावडदा-शिरसोली मार्गे जळगावकडे प्रयाण तसेच सायं 5.30 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण ते करतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !