भोसरी जमीन प्रकरणी मंदाताई खडसे यांनाही ईडीचे समन्स
मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यानंतर मंदाताई खडसे यांनादेखील ईडीने समन्स बजन्स बजावले आहेत. मंदाताई खडसे यांना 21 जुलैनंतर सक्त वसुली संचलनालयात (ईडी) हजर रहावे लागणार असल्याबाबत समन्स बजावण्यात आले मात्र त्यांनी मुदत मागून घेतली आहे. भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील जमीन खरेदीप्रकरणी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीने सुमारे नऊ तास चाकशी केली होती तर खडसे यांचे पुणे येथील जावई गिरीश चौधरी यांना ईडीने 7 जुलै रोजी अटक केली आहे.

